सावंतवाडी: ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे रविवारी वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन करण्यात आले.
ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवून त्यातून मिळणारा आर्थिक नफा गावाच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात ते वापरून गावच्या सर्वांगीण विकासात गेली दोन दशके ते मोठे योगदान देत आहेत. मंडळ यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून मंडळाच्या मुंबई दिनदर्शिकाचे प्रकाशन रविवारी ओटवणे श्री देव रवळनाथ जत्रौ उत्सवाच्या सोहळ्या दिनी करण्यात आले.
यावेळी ओटवणे देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, मानकरी एकनाथ गावकर, बाबाजी गावकर, अण्णा मळेकर, गावचे पुरोहित विश्वनाथ केळकर, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सचिव रामचंद्र उर्फ आबा गावकर, ओटवणे येथील मंडळाचे समन्वयक दशरथ गावकर, सुनील मेस्त्री, गोविंद नाईक, कृष्णा देवळी, बाळू गावकर, नाना गावकर, मधुसुदन गावकर, सचिन गावकर, राजमाला नाईक, राजाराम वर्णेकर, लवू जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या दिनदर्शिका प्रकाशना साठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सचिव आबा गावकर यांनी आभार मानले.