Home शिक्षण ओटवणेत भाजप आणि संदीप गावडे यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप.

ओटवणेत भाजप आणि संदीप गावडे यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप.

140

ओटवणे(प्रतिनीधी): भारतीय जनता पार्टी आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री रविन्द्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून ओटवणेतील रवळनाथ विद्यामंदिर हायस्कूल ओटवणे ,शाळा नंबर १, ओटवणे नं.२ , ओटवणे नंबर ३ व ओटवणे नंबर ४ शाळेतील एकूण २५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ प्रमाणे १२५० वह्यांचे वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाचा शुभारंभ रवळनाथ विद्या मंदिर हायस्कूल ओटवणे येथे करण्यात आला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी रवळनाथ विद्यामंदिर येथे स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांच्यासमवेत गेळे सरपंच संदिप डकरे, तानाजी गावडे,सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, सामजिक कार्यकर्ते उमेश गावकर, अजय सावंत आदी उपस्थित होते. शाळेच्या वतीने हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई सर यांनी संदीप गावडे आणि भाजप पक्षाचे शाळेच्या वतीने आणि विद्यार्थांच्या वतीने आभार मानताना जो वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय त्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि आमच्या रवळनाथ विद्यामंदिर परिवाराकडून आपले आभार आपल्या कडून भविष्यातही असेच कार्य घडो या शुभेच्छा दिल्यात व सर्वांच्या वतीने आभार मानलेत.