Home शिक्षण ओझर विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

ओझर विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

147

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यांच्या संशोधनामुळे राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्यात आला ते थोर भारतीय संशोधक नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी . व्ही . रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने शाळेमध्ये विज्ञान विषयावर आधारित दोन गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विज्ञान दिनाचे महत्त्व व प्राचीन ते अर्वाचीन काळातील भारतीय शोध व संशोधकांबद्दलची माहिती शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री. प्रविण पारकर यांनी व्याख्यानाद्वारे या प्रसंगी विद्यार्थ्यांना करून दिली .या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डी . डी. जाधव व साहा.शिक्षक श्री. अभय शेरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक शिक्षक श्री पी . के. राणे व श्री एन एस परुळेकर यांनी उत्कृष्ट प्रकारे केले.

याप्रसंगी शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री एस.जे.सावंत, शिक्षकेतर कर्मचारी पी.व्ही. खोडके, एम.डी. परुळेकर , रविराज जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री पी. के. राणे यांनी केले.