Home स्टोरी ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचा रक्तदाता सन्मान सोहळा उद्या संपन्न...

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचा रक्तदाता सन्मान सोहळा उद्या संपन्न होणार.

52

सावंतवाडी प्रतिनिधी: ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचा रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित केला आहे. उद्या २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळी रवींद्र मंगल कार्यालय येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, प्रमुख पाहुणे सार्थक फाउंडेशन गोवा सुदेश नार्वेकर, युवराज लखम सावंत भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. या संस्थेने आतापर्यंत हजारोहून अधिक जणांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. तर रक्तदान कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सेवाभावी वृत्तीने ही संस्था वर्षभरापुरी कार्यरत झाली आहे. या संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष मीनल सावंत, कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सदस्य दिनेश गावडे, जितेंद्र पंडित, सचिन कोंडय, बाळकृष्ण राऊळ अशी टीम कार्यरत आहे.

उद्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या वतीचे साधून या संस्थेने रक्तदाता सन्मान गौरव सोहळा आयोजित केला आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन सचिव बाबली गवंडे यांनी केले आहे.