Home शिक्षण ऑनलाई गेमच्या जाहिरात करणं सचिननं थांबावावं अन्यथा भारतरत्न परत करावं! बच्चू कडू

ऑनलाई गेमच्या जाहिरात करणं सचिननं थांबावावं अन्यथा भारतरत्न परत करावं! बच्चू कडू

160

३१ ऑगस्ट वार्ता: प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरानं गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवर पान-गुटखा, तंबाकू, पानमसाला, ऑनलाईन गेमिंक अशा अनेक जाहिराती दाखवल्या जात असलेल्या जाहिरातीमध्ये काम केलं. त्यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज प्रहार संघटनेच्या वतीने सचिन तेंडूलकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. यामुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून आलं.

सचिन तेंडुलकरांच्या बंगल्यासमोर आज बच्चू कडूंनी जोरदार आंदोलन केलं. ऑनलाई गेमच्या जाहिरात करणं सचिननं थांबावावं अन्यथा भारतरत्न परत करावं अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी देखील केली.

दरम्यान, प्रत्येक गणपतीच्या मंदिरासमोर आम्ही दानपेटी ठेवणार आहोत. जेवढा पैसा जमा होईल तेवढा निधी सचिन तेंडुलकर यांना देण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर यांना आर्थिक विवंचना असेल तर त्यांना दान गोळा करून दिलं जाईल. त्यांना चांगली बुद्धी द्या. असं साकडं आम्ही गणपतीला घालणार आहोत. अस बच्चू कडू यांनी म्हटलंय.