Home स्टोरी ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे...

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न .

52

मुबंई प्रतिनिधी:

यावेळी ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले,आई वडिलांच्या पायाशी नतमस्तक झालेल्या प्रत्येक मुला मुलींच्या पायाशी यश लोटांगण घालते. त्यांच्या प्रती व समाजाच्या प्रती नेहमी कृतज्ञ रहा.तसेच वैशाली मार्तंड चव्हाण म्हणाल्या, परस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला. तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. यश आणि किर्ती कोणी मिळवून देत नसत, जिद्दीन काही मिळाल तर कोणी हिरावून घेत नसत. अनिल जाहीर म्हणाले, प्रत्येक चांगल्या कामाचा परतावा हा मिळतोच. तुम्ही जो इतरांना प्रेम, आदर द्याल तो दुप्पटीने तुम्हाला परत मिळेल. एकाद्याची उंची ही त्याच्या वर्तनावर वाढते.प्रत्येक कुटुंबात स्त्रीचा आदर करा. यावेळी श्री राम मांडूरके, सौ. ममता भोई – दौंडे यांनीही मार्गदर्शन केले.

तसेच पुरस्कर्त्या प्रियांका शिंदे यांनी ही शुभेच्छा दिल्या. ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव, समाजरत्न पुरस्कार सन्मान सोहळयाचे पुणे येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष उपस्थिती श्री. अनिल भिमराव जाहीर, तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत बागडेबाबा आश्रम संख,वैशाली मार्तंड चव्हाण,पुण्याच्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्त,मा.श्री. राम मांडूरके,सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, सौ. ममता भोई खानदेशी अभिनेत्री, प्राजक्ता मालुंजकर रिल स्टार/फेम मोह मोह के धाने आदींची खास उपस्थित होती.या सोहोळ्याचे निवेदक म्हणून प्रा. घनश्याम चौगुले महात्मा विद्यामंदिर हाय. व ज्यु. कॉलेज, उमदी यांनी बहारदार सुत्रसंचलन केले. सर्व मान्यवरांचे स्वागत फौंडेशन चे अध्यक्ष श्री अशोक गोरड यांनी शाल व पुस्तक देवून केले. स्वागताध्यक्ष अजित चौगुले संपादक जनदरबार न्यूज,श्री. महादेव महानूर कार्याध्यक्ष, ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य व श्री. अशोक श्रीपती गोरड अध्यक्ष, सौ.सविता गोरड ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र आदीनी सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. हा सोहोळा नुकताच ग. दि. माडगुळकर नाट्यगृह पुणे येथे संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दि मॉडेल इंग्लिश स्कुल, सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी आणि वैद्यकीय अशा निवडक विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानपत्र, ट्रॉफी, पदक व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.