Home स्पोर्ट ए.आय.एस.एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात महिलांसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन.

ए.आय.एस.एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात महिलांसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन.

107

पुणे प्रतिनिधी: २७ सप्टेंबर २०२५, नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ए.आय.एस.एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात महिलांसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची संकल्पना महाविद्यालयाचे श्री मालोजीराजे छत्रपती (सचिव, ए.आय.एस.एस.एम.एस. सोसायटी) यांनी मांडली असून, प्राचार्य डॉ. दत्तात्रय बोरमने, डॉ. दीपक निघोट (विभाग प्रमुख, प्रथम वर्ष अभियांत्रिकी), श्री. अभिजीत भोसले (उपाध्यक्ष, जिमखाना) आणि डॉ. मनीषा कोंढरे यांच्या पुढाकाराने महाविद्यालयात महिलांसाठी या विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण घेतांना महिला

या उपक्रमाचे नेतृत्व अशुतोष शिंदे करीत असून, प्रमुख प्रशिक्षक म्हणून लतेन्द्र भिंगारे मार्गदर्शन करणार आहेत. हा विशेष उपक्रम सहा महिन्यांचा असणार आहे. विद्यार्थिनींना आत्मरक्षणाची मूलभूत कौशल्ये आणि धोका ओळखण्याचे तंत्र शिकवले जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासोबतच आत्मविश्वास वाढवण्यासाठी मानसिक बळकटीकरणावरही भर दिला जाणार आहे.