Home स्टोरी एस. जी. फाउंडेशनच्या वतीने बावळाट आणि सातुळी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

एस. जी. फाउंडेशनच्या वतीने बावळाट आणि सातुळी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

21

सावंतवाडी प्रतिनिधी: मुंबई येथील एस. जी. फाउंडेशनच्या वतीने बावळाट आणि सातुळी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एस. जी. फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी एस जी फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर गावकर, फाउंडेशनचे संस्थापक संदेश गावकर, सातुळी बावळाट सरपंच सोनाली परब, माजी सरपंच उत्तम परब, पोलीस पाटील आबा परब, सुरेश कदम, भास्कर परब, विनायक परब, गजानन गावकर, बावळाट प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री देसाई, सातुळी श्री धुरी, सौ सानप आदी उपस्थित होते.

एस. जी. फाउंडेशनच्यावतीने मुंबईत गेली दहा वर्षे रक्तदान शिबिरे हृदयरोग व नेत्र तपासणी आदी आरोग्य उपक्रमांसह शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सातुळी आणि बावळाट गावातही शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी शंकर गावकर यांनी एस जी फाउंडेशनच्यावतीने यापुढेही बावळाटसह सातुळी गावाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

फोटो: बावळाट – विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी उपस्थित शंकर गावकर सोनाली परब गोपाळ परब आबा परब सुरेश कदम गजानन गावकर व शिक्षक