Home शिक्षण एस.एस.सी. निकाल तालुक्यांत ११ शाळांचा निकाल १०० % न्यू इंग्लिश स्कूलची ज्ञानेश्वरी...

एस.एस.सी. निकाल तालुक्यांत ११ शाळांचा निकाल १०० % न्यू इंग्लिश स्कूलची ज्ञानेश्वरी पागिरे केंद्रात प्रथम!

150

प्रेसक्लबचे उदय कळस यानी सर्व यशस्वींचे केले कौतुक आणि शुभेच्छा

म्हसळा प्रतिनिधी: (संजय खांबेटे): मार्च २०२३  मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक २ जून २०२३ रोजी लागला. न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा  ९८.११ % अंजुमन हायस्कूल  ९५.७८% लागला. याही वर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट होते. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा ची ज्ञानेश्वरी पांडुरंग पागिरे हिने ९५.८०% गुण मिळऊन प्रथम क्रमांक,रोहन मंगेश गायकर ९४.४० % गुण मिळऊन द्वितीय तर समरीन सलीम शहा हिने ९१ % गुण मिळऊन तिसरा क्रमांक मिळविला.अंजुमन हायस्कूल ची वस्ता अक्षा नौशाद प्रथम(८८.४० %),मोहंमद अब्दुल मोईद द्वितीय (८६.६० %) तर बांगी या.मुईद कमरु द्दीन तृतीय ( ८५.४० %).आयडियल इंग्लिश स्कूल चा निकाल याही वर्षी १०० % लागला असून इकरा रेहमत उल्ला घराडे प्रथम ( ९४.६ %),द्वितीय क्रमांक महेक रफीअहमद हुर्जूक  (९२ %),आणि तृतीय क्रमांक हसवारे रदवा मंजूर (९०.४ %).पी.एन. पी. पाष्टी चाही निकाल याही वर्षी १०० % लागला असून प्रथम क्रमांक सारंग निलेश उंडे (८६.८० %),द्वितीय क्रमांक दिया संदिप कांबळे (८५.६० %) आणि तृतीय क्रमांक निल संदिप दिवेकर व प्राची निलेश चव्हाण (८०%).मागास वर्गीयांमध्ये प्रथम रोहन मंगेश गायकर (९४.४० %),द्वितीय क्रमांक सृष्टी भानुदास राठोड आणि तृतीय क्रमांक सुशील देवमन घावट (८३.६० %) .  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गट शिक्षण आधिकारी संतोष दौंड, पोलीस निरीक्षक संदीपान सोनावने ,गटविकास अधिकारी बापूसाहेब  पोळ,स्कूल चेअरमन समीर बनकर, माजी सभापती महादेव, बबन मनवे,प्राचार्य प्रकाश हाके ,मुख्याधिकारी मनोज उकीर्डे, अंजुमन प्राचार्य मोहमद तांबे, चेअरमन नसीर मिठागरे, हलका अध्यक्ष फजल हलदे ,नगराध्यक्ष असल कादिरी, नगर सेवक संजय कर्णिक,नगरसेविका राखी करंबे, उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, अभय कलमकर, नाजिम हसवारे,जमिर कादिरी, मुख्याध्यापक मुलाणी,अजय करंबे, मतीन फनसे,नगरसेवक मुन्ना पानसरे,नगरसेविका जयश्री कापरे आदि मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. फोटो -एस.एस.सी. परीक्षेत ९१ % गुण मिळऊन विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविलेल्या समरीन शहा हिला पेढा भरऊन शुभेच्छा देऊन अभिनंदन करताना नगरसेविका जयश्री कापरे सोबत तीचे कुटुंबिय