सिंधुदुर्ग प्रतिनिधी:
गणपती बाप्पा तुम्ही लवकर या…माझ्या घराला घरपण येऊ द्या…हे बोल आहेत एका आजीचे. हे बोल आहेत, आपल्याच घरातील चाकरमान्यांची म्हणजेच आपल्याच घरातील आपल्या माणसांची , रस्त्याला डोळे लावून वाट पाहणाऱ्या आजीचे..
गणपती आल्यावर, गावी चाकरमानी येऊ लागतात. घर सजत, गणपती येतात, घर अगदी आनंदाने भरून जातं. अशाच एका घरात एकटी राहणारी आजी आपल्या चाकरमान्यांची, म्हणजे आपल्या माणसाची वाट पाहत असते, आणि त्या नंतर या गाण्याचे कथानक सुरू होते. गाणं बघताना अलगद ते मनाला भिडून जाते. अप्रतिम कथानक, सादरीकरण, आणि गाण्याचे बोल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लिहिले आहेत…
गाण्याचे गीतकार संगीतकार आणि दिग्दर्शक सागर गोसावी असून, संगीत दिग्दर्शक आणि गायक रुपेश खंदार आहेत. सोबतच श्रद्धा काळे यांनी त्यांना साथ दिली आहे..रमेश भेकट, संकेत गोसावी, यांनी आपल्या कल्पक नजरेतून सुंदर चित्रीकरण केले आहे. कलाकार सुहास रुके, ऐश्वर्या शिंदे, राजश्री पोतदार, हितीक्षा रवणांग,यांचा उत्तम अभिनय तसेच बालकलाकार सांची गोसावी हिने आपल्या उत्तम अभिनयातून छाप पाडली आहे. तानाजी रावते, राम साबळे आणि संपूर्ण टीम ने खूप मेहनत घेतली आहे.
S.R.Y FILM PRODUCTION या youtube चॅनल वर हे गाणे प्रदर्शित झाले असून , गाण्याचा शेवट खूपच हृदयस्पर्शी आहे..