Home स्टोरी एसटी आगारप्रमुख मिळावा यासाठीचे उद्या असलेले आंदोलन मनाई आदेश संपेपर्यंत स्थगित! योगेश...

एसटी आगारप्रमुख मिळावा यासाठीचे उद्या असलेले आंदोलन मनाई आदेश संपेपर्यंत स्थगित! योगेश धुरी

84

सिंधुदुर्ग: युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने एसटी प्रशासनाच्या विरोधात,कुडाळ आगारप्रमुख गेली कित्येक दिवस रिक्त असल्याने आंदोलन करायचे होते .परंतु उद्या असलेले आंदोलन मनाई आदेशामुळे ते स्थगित करावे लागत आहे. ठाकरे सरकार गेल्यापासून जिल्ह्याची संपूर्ण पणे वाताहात लागली आहे,सावंतवाडी कुडाळ प्रांत नाही त्यांच्याकडे चार्ज दिला ते पण सुट्टी वर आहेत अनेक कार्यालयात अधिकारी नाहीत.पांढऱ्या पायाच्या सरकारने खोके सरकारामुळे जिल्ह्याच्या विकास खुंटला आहे. मुद्दाम आगारप्रमुख दिला नाही आमदार वैभवजी नाईक हे चांगले काम करत आहेत ते आपल्या मूल्यांशी आपल्या जनतेशी प्रामाणिक राहिले म्हणून त्यांच्या मतदारसंघात अश्या प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत प्रांत नाय, कुडाळ आगारप्रमुख नाय,परंतु ही जनता नेहमी आमदार वैभवजी नाईक यांच्या पाठीशी राहील. जिल्हात अनेक प्रश्न आहेत त्याविरुद्ध आवाज उठवू नये म्हणून लोक रस्त्यावर आपल्या विरोधात उतरु नये म्हणून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईत आणि दुसरे मंत्री मोंदींचे फिरण्याचे रेकॉर्ड मोडण्याच्या मनस्थितीत आहेत. मुद्दाम म्हणून जर कुडाळ तालुक्यासाठी आगारप्रमुख दिला नसेल किंवा मुद्दाम म्हणून हजर होत नसेल तर विभाग नियंत्रका विरोधात तसेच संबंधिता विरोधात कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात देखील दाद मागू. मनाई आदेश संपल्यावर आगारप्रमुख मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले यावेळी युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे,युवासेना चिटणीस तानाजी पालव,युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे,विनय गावडे,युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर,युवासेना कुडाळ शहर समन्वयक अमित राणे आदी उपस्थित होते.