लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार.
५ जून वार्ता: पडल्यानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसंच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी त्यांना ७ जून हि तारीख दिली आहे.
भारताच्या१४० कोटी देशवासियांनी मागील दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांमुळं देशाच्या प्रत्येक क्षेत्राला विकसित होताना पाहिलं आहे. बऱ्याच काळापासून भारताच्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतानं सशक्त नेतृत्वाची निवड केली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक एनडीएनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं लढली आणि जिंकली. आम्ही सर्वजण एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांना सर्वसंमतीनं आमचा नेता म्हणून निवड करतो. मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार भारताच्या गरीब-महिला-तरुण शेतकरी आणि शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिबद्ध आहे. भारताचा वारसा संरक्षित करुन देशाच्या सर्वांगिण विकासासाठी एनडीए सरकार भारताच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी काम करत राहिल. हा प्रस्ताव दि. ५जून ला नवी दिल्लीत मंजूर झाला आहे.