Home स्टोरी ‘एक तारीख, एक तास’ महाराष्ट्र बनवूया खास: या मुख्यमंत्री शिंदेच्या स्वच्छता मोहिमेला...

‘एक तारीख, एक तास’ महाराष्ट्र बनवूया खास: या मुख्यमंत्री शिंदेच्या स्वच्छता मोहिमेला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…..

185

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात आज १  आक्टोंबर ला सकाळी १० ते ११ या वेळेत प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी शाळ, कॉलेज, महाविद्यालय आदी विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच रोटरी क्लब इनरव्हील क्लब आधी विविध संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक, माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. शहरात जवळपास प्रत्येक प्रभागात प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या. पालिका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तसेच मुख्याधिकारी सागर साळुंखे, तहसीलदार श्रीधर पाटील आधी या मोहिमेत सहभागी झाले होते.

मोती तलावाचा परिसर तसेच मोती तलावाच्या काठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागात राबवली. आरोग्य विभागाचे निरीक्षक पांडुरंग नाटेकर व त्यांच्या टीमने प्रत्येक प्रभाग निहाय स्वच्छता मोहिमे राबवली. प्रत्येकाच्या हाती झाडू आणि सापडत असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसत होत्या. क्रेडाई सावंतवाडी तालुकाध्यक्ष नीरज देसाई, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. सातोळेकर, सचिव प्रवीण परब, अनंत उचगावकर, साईप्रसाद हवालदार, इनरव्हील क्लबच्या रिया रेड्डीज, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दिपाली भालेकर, गजानन नाटेकर, स्वप्ना नाटेकर आदी आजी-माजी नगरसेवक तसेच भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंधावळे आधी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.