Home स्टोरी एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

107

सावंतवाडी: सावंतवाडी येथील श्री टेंबे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि टेंबे स्वामींनी स्थापन केलेल्या श्री एकमुखी दत्तमंदिर मंदिर येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीदत्त क्षेत्र माणगाव येथील श्री योगेश सावंत भोसले ( M.A म्युझिक ) यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्र आयोजित करण्यात आला. श्री योगेश सावंत भोसले हे पं. सुरेश वाडकर यांचे शिष्य आहेत. खासकीलवाडा व सबनिसवाडा येथील रहिवाशांनी सदर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रथमच श्री एकमुखी दत्त मंदिर येथे असा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी सावंतवाडीतील अनेक संगीत प्रेमींनी आवर्जून उपस्थिती दर्शवून कलाकारांच्या कलेला उत्स्फूर्त अशी दाद दिली. यावेळी श्री पपु तामाणेकर ( M.A तबला विशारद ) व ज्यस्मित पिळंणकर यांनी तबला तर समर्थ केळुसकर (विशारद) यांनी हार्मोनियम आणि कमलाकर कळंगुटकर यांनी झांज साथ दिली. कार्यक्रमाच्या नंतर उपस्थित सर्व रसिकांना कोजागरी निमित्त दूध व भेळ वाटप करण्याचे नियोजन केले होते.