Home राजकारण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिल्लीचे आमंत्रण ; भाजपा अध्यक्षांनी पाठविले पत्र

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिल्लीचे आमंत्रण ; भाजपा अध्यक्षांनी पाठविले पत्र

181

१६ जुलै,दिल्ली वार्ता: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय खलबते सुरू झाली आहेत. मित्रपक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे दिसत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पत्र लिहून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. दिनांक 18 जुलै रोजी दिल्लीतील ‘अशोक हॉटेल’ मध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातून प्रथमच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले होते. या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन अजित पवार इतर 8 आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले.
शनिवारी नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, 18 जुलै रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या विविध समस्याही मांडणार आहे.