३० सप्टेंबर वार्ता: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली असं विधान करत राऊतांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारणीने उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड केली. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील आहे. उद्धव ठाकरेंचा फुटलेला गट नाही. शिंदेंचा फुटलेला गट आहे. आता महाराष्ट्रात त्यांच्या हातात सत्ता आहे. दिल्लीची सत्ता आहे. त्यामुळे काहीही कराल हे चालणार नाही. गेल्यावर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला यंदाही तिथेच होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितले तसेच शिवसेना एकच आहे, जी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आहे. बाकी सर्व चोर, लफंगे सर्वत्र असतात. जर कुणी मीच खरी शिवसेना, मीच राष्ट्रवादी, मीच काँग्रेस असं कुणी म्हणू शकत नाही. तुमच्याकडे सत्ता असल्याने मनमानी करणार का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.
.