शिवसेना उपनेते व कोकण समन्वयक विजय कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती.
उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे):
उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची अतिशय महत्त्वाची बैठक शिवसेना शाखा नवीन शेवा उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर बैठकीला शिवसेना उपनेते व कोकण समन्वयक विजय कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर हे प्रमुख मार्गदर्शक होते.यावेळी मार्गदर्शन करताना उपनेते विजय कदम म्हणाले की, 2024 ला उरण विधानसभा मतदारसंघात मनोहरशेठ भोईर यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे व पक्षाकडून ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीने काम करावे. त्यामध्ये सोशल मीडिया, नवीन मतदान नोंदणी करणे व केलेल्या कामांचा प्रचार करणे या सर्व गोष्टींकडे पदाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन काम करावे , सर्वांनी आळस झटकून पुन्हा एकदा मोठ्या जोमाने काम करून भोईर साहेबांना आमदार करण्यासाठी सज्ज राहावे असे त्यांनी आवाहन केले, तर माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, 2014 ला आपण सर्वांनी मला आमदार केले परंतु दुर्दैवाने आपल्या सर्वांच्या हलगर्जीपणामुळे 2019 ला आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, यावेळी कुठलीही चूक न करता 2024 ला सर्वांनी शिवसेनेचा उमेदवार हा कोणीही असला तरी आमदार करण्यासाठी सज्ज व्हावे व पक्षाने ज्या शिस्तीने किंवा ज्या पद्धतीने आपल्याला काम करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या चौकटीत राहून सर्वांनी कामाला लागून उरण विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे असे त्यांनी सर्वांमध्ये विश्वास निर्माण केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उपजिल्हा संघटिका ममता पाटील यांचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली, तर सूत्रसंचालन उरण उपतालुका संघटक के एम घरत यांनी केले.
सदर बैठकीस उरण विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई)श्री धुरी, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, उरण तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, पनवेल तालुका संघटिका मेघा दमडे ,उपतालुकाप्रमुख डॉक्टर भरत घरत, जगदीश मते, रमेश पाटील कमलाकर पाटील, हनुमान भोईर, अजु सावंत, उपतालुका संघटक अमित भगत, रूपेश पाटील, पनवेल तालुका सहसंपर्कप्रमुख प्रताप हातमोडे, युवासेनेचे पराग मोहिते, नितेश पाटील, केवळ माळी, नगरसेवक अतुल ठाकूर, द्रोनागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, करंजाडे शहरप्रमुख गौरव गायकवाड, उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपशहरप्रमुख, युवासेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी व जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.