Home क्राईम उमेश पाल हत्या प्रकरण अपडेट्स!

उमेश पाल हत्या प्रकरण अपडेट्स!

153

उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्या प्रकरणात आता आणखी काही महत्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांच्या चौकशीत अतिक अहमद याने महत्वाची माहिती दिली आहे. त्याने उमेश पालची हत्या कशी केली? कारागृहातून कशी सूत्रे हलवली? मोबाइल फोन अन् सीमकार्ड कसे मिळवले? ही सर्व माहिती अतिकने पोलिसांना दिली आहे. अतिकला कारागृहातील ज्या सरकारी अधिकाऱ्यांने मोबाईल फोन आणि सिमकार्ड तुरुंगात पोहोचवण्याचे काम केले त्या सरकारी अधिकाऱ्याचे अतिकने नावही सांगितले आहे. बरेली तुरुंगात बंद असलेला त्याचा भाऊ अशरफ यालाही शाइस्ता परवीनने मोबाइल आणि सिम पुरवल्याचे अतिकने सांगितले.

मुख्तार अन्सारी

डॉन मुख्तार अन्सारीच्या मदतीने अतिक अहमद दाऊद टोळीच्या संपर्कात आला. यानंतर अतिक टोळीने पाकिस्तानातून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला. असद अन् गुलाम यांच्यांसोबत झालेल्या चकमकीत विदेशी शस्त्रे जप्त झाली. यामुळे आता एनआयए सुद्धा अतिकच्या तपास करू शकते.

अतिक अहमद

उमेश पाल खून प्रकरणानंतर असद आणि गुलाम यांना सुरक्षित ठेवणे हे अतिकसाठी आव्हान बनले होते. मग अतिकने डॉन अबू सालेमच्या जवळच्या व्यक्तींशी अन् माजी खासदार असलेल्या एका मोठ्या राजकारण्याशी त्याने संपर्क केला. असद आणि गुलाम यांची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली. त्यासाठी अबू सालेमने मदत केल्याचे वृत्त आहे.

अबू सालेम

आतिकचा भाऊ अशरफ आणि इंटरनॅशनल डॉन अबू सालेम यांचे चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे असद आणि गुलामला पुण्यात सालेमच्या जवळच्या लोकांसोबत राहण्याची व्यवस्था केली गेली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम तुरुंगात आहे. त्याचे नेटवर्क महाराष्ट्रात अजूनही सक्रिय आहे. अबू सालेमच्या सांगण्यावरुन अश्रफला पुण्यात आश्रय दिला गेला होता, अशी माहिती आहे.

आता पुणे पोलीस अन् महाराष्ट्र एटीएस सक्रीय झाले आहे. अबू सालेम याचे पुण्यातील नेटवर्क शोधण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांत या प्रकरणात पुण्यातील काही लोकांना अटक होणार आहे.