उमेद च्या सर्व मागण्या मान्य करत आहे! मान. ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन….

मुंबई प्रतिनिधी: ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांनी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनात संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले.यामध्ये सर्व सीआरपी ताईंची मानधन वाढ, कर्मचाऱ्यांची मानधन वाढ, प्रत्येक गावामध्ये नवीन सीआरपी निवड, कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. “चार दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये निर्णयाला मंजुरी घेऊन निर्णय जाहीर करू व एक ऑगस्ट पासून हे निर्णय लागू करू”,असे माननीय गिरीश महाजन यांनी उपस्थित लाखो महिलांना सांगितले.

मुंबई आझाद मैदान येथे मुसळधार पाऊस पडत असतानाही संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो महिला व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आझाद मैदानही कमी पडू लागले होते एवढी मोठी संख्या उपस्थित होती.रात्री उशिरा मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानंतर आझाद मैदानावर चालू असलेले उपोषण व भव्य मोर्चा समाप्त करण्यात आला.
