मसुरे प्रतिनिधी:
देवगड तालुक्यातील जि.प. शाळा जामसंडे नं १ मधील उपक्रमशील आणि सामाजिक उपक्रम राबविणारे शिक्षक दिनेश सुरबा दळवी यांना राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर मित्रमंडळामार्फत दिला जाणारा “गुरुसेवा गौरव पुरस्कार” सन 2023 जाहीर झाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणाऱ्या उपक्रमशील अशा प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक विभागातून एक शिक्षक व एक माध्यमिक शिक्षकांचा गौरव केला जातो. यंदा पुरस्काराचे बारावे वर्ष असून पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्हव ग्रंथ असे असणार आहे.
पुरस्कारप्राप्त दळवी सर यांचे देवगड पं.स. गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे, केंद्रप्रमुख सुदाम जोशी, मुख्याध्यापिका विनया सातार्डेकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.