Home स्टोरी उद्या चांद्रयान-3 चंद्रावर उतरणा!

उद्या चांद्रयान-3 चंद्रावर उतरणा!

100

२२ ऑगस्ट वार्ता: संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय ते भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे. कारण आता लँडिंगचं काऊंटडाऊन सुरू झालाय आणि उद्या म्हणजे दि .23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा असेल. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटवर असून लँडिंगची तयारी सुरू आहे. दरम्यान, रशियाच्या लुनाबाबत दोन दिवसांपूर्वी झालेली दुर्घटना आणि भारताच्या चांद्रयान-२चा मागचा अनुभव लक्षात घेता इस्रोनं मोठी काळजी घेतलीय. चांद्रयान-३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं, अशी माहिती इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी दिलीय.

 

भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर लँड होणार आहे अशी माहिती इस्रोनेच तशी माहिती दिली आहे. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून 15 मैलावर आहे त्यामुळे चांद्रयान 3 लँडिंग होण्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहचांद्रयानाला चंद्रावर उतरवण्याच्या दोन तास आधी इस्रोकडून लँडर आणि चंद्राच्या परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करुन त्यानंतर लँडरला चंद्रावर लँड करण्याचा निर्णय घेतला जाईल

 

लँडर आणि चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नसेल तर हे 27 ऑगस्टपर्यंत सर्व प्रक्रिया पुढे ढकलली जाईल. पण त्याआधी 23 ऑगस्टला लँडरला चंद्रावर लँड करणार असल्याचं इस्त्रोचे शास्त्रज्ञ निलेश एम. देसाई यांनी सांगितलं.