Home स्टोरी उद्या कल्याण पूर्वेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ‘भिमसांज’ या नाटकाचा...

उद्या कल्याण पूर्वेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ‘भिमसांज’ या नाटकाचा एकपात्री नाट्य प्रयोग!

56

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड):– विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कल्याण पूर्व आणि मैत्रेय संगत या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्या कल्याण पूर्वेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या निमित्त महात्मा फुले यांच्या जिवनावर आधारी ‘भिमसांज’ या एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे .या वर्षीच्या आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा आयु . सिंधुताई मेश्राम यांच्या अधिपत्त्याखाली ‘भिमोत्सव -२०२३ ‘ या अंतर्गत ९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ या कालावधीत विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्याच्या महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती दिनी कबीर रंजन जगताप प्रस्तुत महात्मा ज्योतीबा फुले यांच्या संघर्षमय जिवनावर आधारीत ‘भिमसांज’ या एकपात्री प्रयोगासह प्रबोधनात्मक गित – संगित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीएटीव्ह चौक दुर्गामाता मंदीरा जवळ, कोळसेवाडी कल्याण पूर्व येथे उद्या सायं. ७ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमास तमाम नागरीकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्षा आयु. सिधुताई मेश्राम तसेच मैत्रेय संगत संस्थेचे अध्यक्ष रविंद्र रिपोटे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.