मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): शिवसेना उधव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते मुंबई मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दैनंदिनी २०२३ चे प्रकाशन मुंबई येथे करण्यात आले. या शिवसेना दैनंदिनीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे व इतर सर्व नेते, उपनेते, प्रवक्ते सचिव, खासदार, आमदार, पुरुष व महिला विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेस सलग्न असलेल्या विविध संघटना, महानगरपालिकेचे सर्व आजी माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख नंबर तसेच दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेली बहुमोल माहिती यात अंतर्भूत आहे.
हया शिवसेना दैनंदिनी २०२३ ची निर्मिती जी. एस्. परब व साकेत पवार यांनी केली असून ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दैनंदिनी २०२३ दिनांक ८ मे पासून शिवसेना भवन, दादर येथे उपलब्ध होईल. यावेळी आमदार श्री. रविंद्र वायकर, सचिव श्री. मिलिंद नार्वेकर, जनसंपर्क प्रमुख श्री. हर्षल प्रधान आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी. एस्. परब व साकेत पवार आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्ष कांदळगाव चे सुपुत्र ज्येष्ठ शिवसैनिक जी एस परब व संकेत पवार हे ही दैनंदिनी तयार करत आहेत.
फोटो: शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबई मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी सोबत आमदार श्री रवींद्र वायकर, सचिव श्री मिलिंद नार्वेकर, जनसंपर्कप्रमुख श्री हर्षल प्रधान, दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी एस परब व सांकेत पवार…