कणकवली (प्रतिनिधी) : दर्पणचे संस्थापक, विद्रोही साहित्यिक,आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने १० एप्रिल रोजी कणकवली येथील एकदंत प्लाझा तळमजला, (जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या खाली )येथे सकाळी 8 वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्रोही साहित्यिक उत्तम पवार यांचा १० एप्रिल हा जन्मदिवस. दुर्दैवी अपघातात अकाली निधन झालेले स्मृतीशेष उत्तम पवार यांनी दर्पण प्रबोधिनीच्या माध्यमातून वंचितांच्या दबलेल्या आवाजाला समाजभान दिले. म्हणूनच त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करून संस्थेच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे आणि रक्तदान करून संस्थेच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन दर्पण प्रबोधिनी च्या वतीने अध्यक्ष आनंद तांबे ,उपाध्यक्ष नरेंद्र तांबे आणि सरचिटणीस सुभाष कदम यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी-
डॉ.अशोक कदम मोबा. 9422373590,संदेश कदम मोबा. 9922696771, राहुल कदम मोबा. 7744073791, विशाल कासले मोबा. 8411098061, गौरव कदम मोबा. 7588449763, अजित तांबे – 9423365943 , प्रकाश किर्लोस्कर- 9420258537 यांच्याशी संपर्क साधावा.