Home स्टोरी उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच म्हणा! जिल्हाधिकार्‍यांचा आदेश…

उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच म्हणा! जिल्हाधिकार्‍यांचा आदेश…

57

१७ मे वार्ता: उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल आणि इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काढला आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व कार्यालय आणि विभागप्रमुख यांना दिले आहेत.शहराचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यासाठी केंद्रशासनाने संमती दिल्यानंतर अनेक ठिकाणी पालटलेल्या नावाचा उल्लेख चालू झाला आहे, तर काही शासकीय कार्यालयांनीही कार्यालयांच्या नामफलकात नवीन नावाने पालट केला आहे. नामांतराविषयी प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असतांना महसूल आणि इतर विभागांशी संबंधित कार्यालये जिल्ह्याचे नाव पालटत असल्याची गोष्ट याचिकाकर्ते आणि त्यांचे विधीज्ञ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.