Home क्राईम ई स्टोअर इंडिया फसवणूक प्रकरणाची EOW सिंधुदुर्गकडून जोरदार चौकशी सुरु.

ई स्टोअर इंडिया फसवणूक प्रकरणाची EOW सिंधुदुर्गकडून जोरदार चौकशी सुरु.

267

सिंधुदुर्ग: ई स्टोर इंडिया या कंपनीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांची दुरावस्था झालेली आहे.  ई स्टोअर इंडिया कंपनीचे मालक फैजान खान आणि त्यांच्या काही प्रमुख साथीदाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांना तुमचे पैसे ३६ महिन्यात तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लाखो करोडो रुपयांना लुटले आहे. या ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये पैसे गुंतवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यक्ती उध्वस्त झाले आहेत. त्या उलट मात्र स्टोअर इंडिया कंपनीचे मालक फैजान खान आणि त्यांच्या काही प्रमुख साथीदार अनिल जाधव रा. (पनवेल), संजना परांजपे(पनवेल), रौनक पटेल रा. (कणकवली), शैलेंद्र पेडणेकर रा. ( मळगावं), विजय कुडव रा. (इन्सुलि), स्वप्नील गावडे रा. (असोली), किरण कदम रा. (नेरुळ), ज्योती जाधव रा. (देवगड), सीमा लंगोटे रा. (देवगड), संजय पवार (सावंतवाडी), राजन पाताडे (सावंतवाडी), विजय कुडव (इन्सुलि) लोकांनी अमाप पैसे आणि संपत्ती कमवल्याचे दिसून येत आहे. या सर्व लोका विरोधात देवगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवकर यांनी याबाबत सर्व योग्य तो तपास करून या प्रमुख लीडरवर गुन्हे दाखल करुन तपास हा सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हा आणावेशन शाखा कडे देण्यात आला आहे.

ई स्टोअर इंडिया कंपनीचे मालक फैजान खान

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्हाचे आर्थिक गुन्हा आणावेशन शाखा सिंधुदुर्ग (EOW) याबाबत आता सर्वतोपरीत चौकशी करून अनेक लोकांचे जबाब घेत आहेत. यामध्ये अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हातील लोकांनी लाखो रुपये ई स्टोअर इंडिया या कंपनीकडे गुंतवल्याचे पुरावे समोर आले आहेत. या प्रकरणात प्रथम तपासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना फसवण्यासाठी ई स्टोअर इंडिया कंपनीचे मालक फैजान खान यांचे  प्रमुख साथीदार अनिल जाधव रा. (पनवेल), संजना परांजपे(पनवेल), रौनक पटेल रा. (कणकवली), शैलेंद्र पेडणेकर रा. ( मळगावं), विजय कुडव रा. (इन्सुलि), स्वप्नील गावडे रा. (असोली), किरण कदम रा. (नेरुळ), ज्योती जाधव रा. (देवगड), सीमा लंगोटे रा. (देवगड), संजय पवार (सावंतवाडी), राजन पाताडे (सावंतवाडी), विजय कुडव (इन्सुलि) हि नावे समोर आली आहेत. ई स्टोअर इंडिया कंपनीचे मालक फैजान खान यांच्या या प्रमुख साथीदारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अमाप संपत्ती आणि पैसा जमा केला असल्याची माहिती मिळत आहे. ई स्टोअर इंडिया कंपनीच्या लीडर यांनी मालवण देवबाग बीच येथे मॅट्रिक होम या इमारतीमध्ये  महागड्या किमतीचे फ्लॅट घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच मुंबई, पुणे अशा ठिकाणी सुद्धा ह्या काही लीडरांनी मोठमोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केले आहेत. यापैकी काही लीडरांनी सावंतवाडी शहरातील जुना शिरोडा नाका येथील द्वारकामाई बिल्डिंगमध्ये लाखो रुपये किमतीचे खरेदी केले आहेत. अशी माहिती उघडकीस आली आहे. याव्यतिरिक्त काही लोकांनी 20 ते 25 लाखाच्या दर्जेदार अलीशान महागड्या फोर व्हीलर गाड्या ही विकत घेतलेल्या दिसून येत आहेत. हा सर्व पैसा यांचा स्वतःचा नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक गोरगरीब लोकांचा आहे. हे आता सिद्ध झाले आहे आणि लवकरच या लोकांवर कारवाई होणार आहे अशी माहिती EOW कडून मिळत आहे. सावंतवाडी शहरातील एका लीडरच्या टीम मधील व्यक्तीने पैशाची फसवणूक झाल्यामुळे व सध्या काही पर्याय नसल्यामुळे विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असेही माहिती मिळत आहे.

ई स्टोअर कंपनीचे प्रमुख लीडर अनिल जाधव
ई स्टोअर इंडिया कंपनीची महिला लीडर संजना परांजपे

कंपनीचे सर्वात महत्त्वाचे वरिष्ठ लीडर जाधव यांनी ई स्टोअर इंडिया कंपनी मार्फत कमावलेल्या पैशातूनच शतायुषी आणि गोवर्धन या कंपन्या सुरू केल्या आहेत. या कंपन्यांमार्फत काढण्यात आलेले मेडिकल प्रोडक्ट हे खूप महागडे असून तसेच ते मानवी शरिरावर कोणत्याही प्रकारे योग्य पद्धतीने काम करत नसल्याची माहिती मिळत आहे. अनिल जाधव यांनी काढलेल्या शतायुषी कंपनीचे सध्याचे सीएमडी हनुमंत सावंत असून त्या कंपनीचे ऑफिस ओरस जैतापकर कॉलनी या ठिकाणी आहे. शतायुषी या कंपनीमध्ये हनुमंत सावंत व्यतिरिक्त आज पर्यंत अनेक नेटवर्क कंपन्यांमध्ये काम करून लोकांची फसवणूक केलेले आणि ई स्टोअर इंडिया कंपनी काम करून लोकांची फसवणूक केलेले प्रमुख लीडर रौनक पटेल हे जोरदार काम करत असल्याची माहिती मिळत आहे. आता या शतायुषी कंपनीच्या मार्फत सुद्धा जिल्ह्यातील लोकांची फसवणूक होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कंपनीची प्रमुख महिला लीडर्स संजना परांजपे हि शतायुषी आणि गोवर्धन कंपनीमध्ये प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे. शतायुषी या कंपनीसाठी प्रॉडक्ट पुरवणारे ए.आर. राजा एक साउथ इंडिया मधले मोठे सायंटिस्ट आणि आर्मीमध्ये मोठ्या पदावर काम करून आलेले आहेत अशी माहिती शतायुषी काम करणारे काही व्यक्ती देत आहेत. मात्र हे सर्व काही खोटं असल्याची माहितीमिळत आहेत. त्यामुळे ए. राजा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचीहि पोलिसांकडून कसून चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

ई स्टोअर कंपनीचे करोडपती लीडर स्वप्नील गावडे
ई स्टोअर कंपनीचे करोडपती लीडर स्वप्नील गावडे यांची महागडी गाडी
ई स्टोअर कंपनीचे मालक फैजान खान सोबत करोडपती लीडर स्वप्नील गावडे
करोडपती लीडर स्वप्नील गावडे आणि महाराष्ट्र गोवा प्रमोटर शैलेंद्र पेडणेकर

ई स्टोअर इंडिया कंपनीचे महाराष्ट्र गोवा प्रमोटर शैलेंद्र पेडणेकर आणि शैलेंद्र पेडणेकर यांच्या पत्नी सौ अर्चना पेडणेकर यांच्यावर व गोवा EOW कडे गुन्हे दाखल झाले आहेत. शैलेंद्र पेडणेकर आणि शैलेंद्र पेडणेकर यांच्या पत्नी सौ अर्चना पेडणेकर यांना गोवा EOW कडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्याप्रमाणे दिल्ली EOW कडे स्वप्नील गावडे (असोली), शैलेंद्र पेडणेकर, अनिल जाधव, संजना परांजपे आणि काही महत्त्वाच्या लीडरांवर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे.

👆मालवण तारकर्ली येथील प्रोजेक्ट ज्यामध्ये ई स्टोअर इंडिया कंपनीच्या लीडर लोकांनी गुंतवणूक केली आहे.

👆 भेरा चित्रपटासाठी सुद्धा ई स्टोअर इंडिया कंपनीचे प्रमुख लीडर अनिल जाधव यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट केल्याची माहिती मिळत आहे. तसेच निर्माता म्हणून अनिल जाधव असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.