Home स्टोरी ई स्टोअर इंडिया कंपनी बाबत महत्वाची अपडेट…! काही तज्ञ लोकांनी दिला सावधानतेचा इशारा.

ई स्टोअर इंडिया कंपनी बाबत महत्वाची अपडेट…! काही तज्ञ लोकांनी दिला सावधानतेचा इशारा.

330

संपादकीय: ई स्टोअर इंडिया कंपनी चे प्रमुख मालक फैजान खान भारतातील वेगवेगळ्या राज्यात कंपनीचे काम सुरू करून अनेक लोकांना लाखो, करोडो रुपयाचा गंडा घातल्याची माहिती सर्वांना आहेच. कंपनीचे सीएमडी फैजान खान आणि फैजान खान यांच्या हाताखाली काही काम करणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींनी अनेक लोकांचं जीवन उध्वस्त केलेले आहे हे ही नाकारता येणार नाही. प्रामुख्याने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर ई स्टोअर इंडिया कंपनी साठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक महिला लीडर आहेत ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करून अनेक लोकांना लुटलं आहे. पण दुर्दैव असं की आज फक्त काही मोजक्या पुरुष लीडरांना काही राजकीय नेते त्रासदायक ठरत आहेत. मात्र हेच राजकीय नेते ई स्टोअर इंडिया च्या महिला लीडरांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास येतं आहे. या मागचं नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट होत नाहीय. काही महिला ई स्टोअर इंडिया या नेटवर्क कंपनीचे काम बंद करून इतर अनेक नेटवर्क कंपन्यांचे काम करून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांना पैस्याना लुटत आहेत. अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे साहजिकच ई स्टोअर इंडिया सारख्या कंपनीमध्ये काम करून स्वतःला लखपती, करोडपती बनवून ज्या काही महिला आता ई स्टोअर इंडिया या कंपनीला सोडून पुन्हा दुसऱ्या नेटवर्क कंपनीचे प्लॅन घेऊन सामान्य माणसाला लुटण्यासाठी पुढे येत आहेत अशा महिलांपासून सावध रहा, असा इशारा काही तज्ञ लोकांनी दिला आहे. तसेच प्रामुख्याने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करून काही महिला लोकांना लुटण्यात अग्रेसर आहेत असं दिसून येत आहे. त्यामुळे अशा महिलांपासून सावध राहणे हे अति महत्त्वाचे आहे.

ई स्टोअर इंडिया कंपनीचे मालक फैजान खान

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई स्टोअर इंडिया या कंपनीचे मालक फैजान खान यांनी आजवर अनेक लोकांना उध्वस्त केले आहे. या कंपनी मुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. असं असतानांही आज सिंधुदुर्ग जिल्हातील काही विपरीत, मूर्ख तसेच स्वार्थी आणि धूर्त व्यक्ती स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी फैजान खान सोबत काम करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच कंपनीचे नवनवीन प्लॅन आणून लोकांना लुटण्याच्या योजना आखत आहेत. तरी या अशा विपरीत आणि स्वार्थी बुद्धीच्या व्यक्तींपासून जिल्हातील सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे. जिल्हातील लोकांचे गेलेले लाखो, करोडो रुपये परत मिळणार नाही हेच एकमेव सत्य आहे. पण लोकांचे गेलेले लाखो रुपये परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्हातील लोकांना पुन्हा पुन्हा गुंतवणूक करायला सांगत असलेल्या अशा काही विनाशकारी, विपरीत, मूर्ख आणि स्वार्थी लोकांपासून जिल्ह्यातील लोकांनी आता सावध राहणे गरजेचे आहे. योग्य वेळी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क याच डिजिटल बातमीपत्राद्वारे ई स्टोअर इंडिया कंपनीचे जिल्ह्यातील प्रमुख लीडर ज्यांनी लोकांना लाखो रुपयाला लुटून आज स्वतः करोडपती झाले आहेत. त्यांची नावे फोटो सहित प्रसारित केली जातील. तसेच या लोकांना पुन्हा कोणत्याही नेटवर्क कंपनीचे काम घेऊन आल्यास हाकलून लावलं पाहिजे असं मत काही व्यक्तींनी व्यक्त केलं आहे.