Home Uncategorized इ डब्ल्यू एस दाखले मिळत नसल्याने सकल मराठा समाज सावंतवाडी तहसीलदारांना जाब...

इ डब्ल्यू एस दाखले मिळत नसल्याने सकल मराठा समाज सावंतवाडी तहसीलदारांना जाब विचारणार -सीताराम गावडे

102

शैक्षणिक संस्थेने प्रवेशा वेळी मराठा समाजाच्या मुलांना आरक्षणाचा लाभ देणे गरजेचे.

 

सावंतवाडी: सकल मराठा समाजाच्या वतीने इ डब्ल्यू एस आरक्षण बाबतचे दाखले देण्यास सावंतवाडी तहसिलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने याचा जाब विचारण्यासाठी सोमवार दि १७ जून ठीक अकरा वाजता सावंतवाडी तहसिलदार कार्यालयावर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी धडक देणार आहेत तरी ज्या पालकांना इ डब्ल्यू एस चे दाखल मिळाले नाहीत त्यांनी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच प्रत्येक शालेय शिक्षण संस्थने अकरावी प्रवेशा वेळी मराठा मुलांना आरक्षणाचा लाभ देणे बंधनकारक आहे,मात्र जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांकडून याची अंमलबजावणी होत नाही या बाबतचा जाबही शिक्षण संस्थांना विचारण्यात येणार आहे त्यामुळे सोमवार दि १७ जून रोजी सर्व सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांनी व पालकांनी ठिक अकरा वाजता हाॅटेल मॅगो टू गार्डन शेजारी जमावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.