Home स्टोरी इस्राईलमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा.

इस्राईलमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा.

164

देश विदेश: इस्राईलमध्ये आज शनिवार दि.  ऑक्टोबर सकाळी ४ वाजल्यापासून गाझा पट्ट्यातून हमास दहशतवादी संघटना इस्त्रायलच्या प्रदेशावर हल्ला करत आहे.  हमास आणि इस्लामिक जिहादने आतापर्यंत किमान २२ नागरिकांना ठार केले आहे. आज झालेल्या या हल्ल्यामध्ये ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात गाझामधून इस्राईलमध्ये घुसखोरी करुन देशाच्या दक्षिणेकडील आणि मध्य प्रदेशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने शनिवारी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. इस्राईलने गाझा पट्टीमध्ये एअर स्ट्राईक करण्यास सुरुवात केली आहे. इस्राईलच्या एअर फोर्सने देखील एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी असणाऱ्या हमास दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं जात आहे.