२३ ऑक्टोबर वार्ता: गेल्या सोळा दिवसांपासून इस्रायल हमास संघर्ष सुरु आहे. या संघर्षात गाझा पट्टीतील हजारो नागरिक बेघर झाले असून गाझा पट्टी सोडून चालले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीत पुन्हा मोठा हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यात एका रात्रीत ४०० नागरीक ठार झाले आहे. पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFA ने दिलेल्या वृत्तानुसार पॅलेस्टिनी प्रदेशातील निवासी भागावर हे हल्ले करण्यात आले आहे. यापूर्वी एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ५०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र इस्त्रालयाने हा हल्ला केला नसायचं म्हटलं आहे. आणि पॅलेस्टिनी संघर्ष मोठ्या प्रमाणात चिघळला आहे.
इस्रायल लष्कराने लेबनॉनमधील हिजबुल्ला लष्करी तळांवर हल्ला केला. याशिवाय लेबनीज सीमेवर कार्यरत असलेल्या हिजबुल्लाहच्या पथकावर देखील एयर स्ट्राईककेला आहे. पॅलेस्टिनच्या मदतीसाठी भारताने मोठी मदत पाठवली आहे. यात वैद्यकीय मदत आहे. एका विशेष विमानाने त्यांना ही मदत पाठवली आहे.