Home स्टोरी इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक मोदी सरकारच्या महत्वाच्या सूचना जारी

इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक मोदी सरकारच्या महत्वाच्या सूचना जारी

172

७ ऑक्टोबर वार्ता: इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारीवर शनिवारी सकाळी चार वाजल्यापासून हमास दहशतवादी संघटना हल्ले करत आहे. सकाळच्या सुमारास दोन तासांमध्ये ५ हजार रॉकेट हल्ले झाल्याचं बोललं जातं. अनेक दहशतवादी इस्त्रायलमध्ये घुसले आहेत. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झालीये. यापार्श्वभूमीवर भारत सरकारकडून तेथील आपल्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

विनाकारण कुठेही बाहेर पडून नका, ज्या ठिकाणी सुरक्षित स्थळे आहेत त्याच ठिकाणी थांबा. तसेच काही मदतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या, असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. हमासच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत चार इस्त्रायली नागरिक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीयांना खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.