सावंतवाडी प्रतिनिधी: शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले असता निश्चितपणे आपले आर्थिक उन्नती होईल आणि आपले दरडोई उत्पन्न वाढू शकेल. आज दुधाला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे मागणी जास्त आणि उत्पादन कमी त्यामुळे या व्यवसायाकडे शेतकरी त्याचबरोबर तरुण वर्ग आणि महिला वर्ग यांनी वळणे गरजेचे आहे. आपले कुटुंब आर्थिक दृष्ट्या सवल झाले पाहिजे. तर निश्चितपणे दुग्ध व्यवसायाला चालना देणे महत्त्वाचे ठरेल. दुग्ध उत्पादकांनी योग्य मार्गदर्शन घेऊन शेती व्यवसाय करावा असे आवाहन दुग्ध संस्थेचे अध्यक्ष श्री गुरुनाथ पेडणेकर यांनी मार्गदर्शन करताना केले. यावेळी इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रथम रेश्मा संदेश पालव, द्वितीय गितेश गोकुळदास पोपकर, तृतीय भ्रुंजल दिनेश गावडे तसेच समाजशास्त्र विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळवणारी सृष्टी संतोष सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच सन 2024 -2025 या आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन करणाऱ्या प्रथम पाच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम आनंद भगवान शेट्टी, द्वितीय संजय श्रीधर सावंत, तृतीय रुपेश लहू परब, चौथा फॅली घस पार फर्नांडिस, पाचवा विलास कृष्णा गावडे या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला त्याचबरोबर यावर्षी संस्थेच्या वतीने भेटवस्तू सर्व दूध उत्पादकांना देण्यात आली.
यावेळी कुमारी रेश्मा पालव, कृष्णा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री गुरुनाथ पेडणेकर, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, माजी चेअरमन जगन्नाथ झाट्ये, सचिव संजय सावंत, सहदेव सावंत, सखाराम बागवे, रामचंद्र पालव, विलास गावडे, सुधीर गावडे, गुरुनाथ हळदंणकर, सूर्यकांत सावंत, आनंद शेट्ये, अशोक पडवळसूर्यकांत दळवी आदी दुग्धोत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर तर आभार संजय सावंत यांनी मानले.







