२२ जुलै वार्ता: सावंतवाडी नगर परिषदेमधील कंत्राटी पद्धतीवर असलेल्या ५० सफाई कामगारांना इनेर्र्न्विल क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे आज छत्री वाटप करण्यात आले. याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्ष रिया रेडीजयांनी सफाई कामगार म्हणजे,” सामान्य जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांनी करत असलेल्या कामासाठी एक कौतुकाची थाप म्हणून इनरव्हील क्लब कडून त्यांच्या कुटुंबासाठी हे छत्री वाटप करण्यात आल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमास आरोग्य परीक्षक श्री दिपक मापसेकर इनरव्हील अध्यक्षा रिया रेडीज, सेक्रेटरी मीना जोशी, श्रेया नाईक, नेत्रा सावंत,अनिता भाट,सुहस्नी तळेगावकर, मीनल नाईक,सुरेखा बरेगार, संगीता शेलटकर,दर्शना रासम, उल्का डिसोजा साधना रेगे यांनी सुद्धा छत्री वाटप कले. इनरव्हील क्लबच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे शहरांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
