सावंतवाडी प्रतिनिधी: गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे कुंभारवाडा या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी करत जिल्हा व विभागीय पातळीपर्यंत गवसणी घातली. यामध्ये जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत कु. अमेय प्रशांत गावडे (14 वर्षाखालील मुले ) तर कु. मानवी संतोष म्हारव ( 17 वर्षाखालील मुली ) यांची विभागीय स्तरावर निवड झाली. तसेच तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले या गटात कु.पियुष संजय परब आणि कु.गणेश विशाल परब तसेच 14 वर्षांखालील मुलींच्या गटात कु.प्रांजल अनिल जाधव यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युडो साठी श्री मंगेश घोगळे , कॅरम साठी श्री अश्फाक शेख तसेच प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रसन्न सोनुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे प्रशालेच्या कार्यकारी अधिकारी सौ मैथिली मनोज नाईक मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अजय बांदेकर उपमुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.







