Home शिक्षण इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

71

सावंतवाडी प्रतिनिधी: गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट सावंतवाडी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या सीईओ श्रीमती मैथिली मनोज नाईक, पालक शिक्षक कमिटीचे सदस्य श्री वामनराव सावंत- भोसले, श्री प्रसाद नागडे, सौ विद्या बुगडे, सौ. साक्षी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयोजित विविध सहशालेय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रशालेच्या सीईओ यांनी विद्यार्थ्यांना यश प्राप्त करायचे असेल तर कठोर मेहनत व चिकाटीने परिश्रम घेऊन, योग्य दिशेने अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ग्रामीण भागामध्ये प्रशालेने अल्पावधीतच मिळवलेल्या यशाबद्दल केलेल्या प्रगतीबाबत सर्व स्तरातून शाळेचे कौतुक करण्यात आले व समाधान व्यक्त करण्यात आले. व यापुढेही अशाच प्रकारे शाळेने विविध क्षेत्रांमध्ये दैदीप्यमान यश संपादन करणारे विद्यार्थी घडवावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विभाग प्रमुख श्रीमती प्रिया मल्हार, प्रियंका गावडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री वसंत सोनुर्लेेकर यांनी मानले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या सी ई ओ मैथिली मनोज नाईक, प्रशालेचे शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी, पालक- शिक्षक संघ सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अजय बांदेकर, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.