Home स्टोरी इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे शाळेने एक तास श्रमदान करून तळवडे बाजारपेठेत केली...

इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे शाळेने एक तास श्रमदान करून तळवडे बाजारपेठेत केली स्वच्छता. 

395

सावंतवाडी प्रतिनिधी: गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट सावंतवाडी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे शाळेने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत तळवडे बाजारपेठ येथे एक तास श्रमदान करून बाजारपेठेतील परिसर स्वच्छ केला. परिसर स्वच्छ करण्यापूर्वी सर्वांनी कचरा न करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.

स्वच्छता अभियानात सहभागी विध्यार्थी

विद्यार्थ्यांनी गटामध्ये बाजारपेठेचा परिसर स्वच्छ केला, त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री अजय वामन बांदेकर, तळवडे बाजारातील ग्रामस्थ, स्थानिक व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या संचालिका श्रीमती मैथिली मनोज नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.