Home स्टोरी आ. वैभव नाईक यांनी मसुरे भरतगड किल्ल्यावरील सिद्धनाथ मंदिरात व मसुरेतील साईबाबा...

आ. वैभव नाईक यांनी मसुरे भरतगड किल्ल्यावरील सिद्धनाथ मंदिरात व मसुरेतील साईबाबा मंदिरांमध्ये भेट देऊन घेतले दर्शन

273

दसरा उत्सव व श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचे निमित्त….

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मसुरे भरतगड किल्ल्यावरील सिद्धनाथ मंदिरात आज दसरा उत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भरतगड किल्ल्याची देखील पाहणी केली. त्याचबरोबर श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त मसुरे,मेढा,गडघेरा येथील साईबाबा मंदिरात त्यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थान मंडळांच्या वतीने आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर, मसुरे गाव राठीचे सर्व मानकरी व ग्रामस्थ, मसुरे विभागप्रमुख व उपसरपंच राजेश गांवकर,पोईप विभागप्रमुख विजय पालव, मसुरे विभाग समन्वयक सुहास पेडणेकर, सरपंच संदीप हडकर,आयवान फर्नांडिस,दत्तप्रसाद पेडणेकर,प्रदीप पाटकर, नीळकंठ शिरसाठ,रोहन म्हाडगुत,अवधूत चव्हाण,अशोक साबाजी बागवे,उमेश बागवे,मनीष बागवे,विकास बागवे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.