ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओरोस आणि कसाल येथे पूरस्थिती उद्भवली आहे.नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय व नुकसान झाले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालय काही अंतरावर असताना देखील जिल्हाधिकारी यांनी नागरिकांसाठी तातडीची उपाययोजना केली नाही. तात्काळ मदतकार्य करण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धारेवर धरले. घरात पाणी शिरलेल्या कुटूंबियांना तात्काळ मदत पुरविण्याच्या सक्त सूचना आ. वैभव नाईक यांनी त्यांना दिल्या.