कुसगाव ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. चवाटेकर व ग्रामस्थांनी केला निर्धार
गिरगाव कुसगाव येथील विविध विकास कामांची झाली भूमिपूजने
सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांचे काम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कुडाळ तालुक्यातील जनतेच्या कामांसाठी ते विधानसभेत भांडत आहेत. ज्या प्रमाणे ते आपल्याला सहकार्य करत आहेत. तसेच सहकार्य आपल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांना होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कुसगाव येथील ग्रामस्थ व कुसगावचे मुंबई ग्रामविकास मंडळ हे आ. वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीर राहणार असून,भरघोस मतांनी आ. वैभव नाईक यांना विजयी करू असा निर्धार कुसगाव ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री चवाटेकर व कुसगाव ग्रामस्थांनी केला आहे.
आ. वैभव नाईक यांनी गिरगाव कुसगाव येथे मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने रविवारी त्यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री. चवाटेकर बोलत होते.
आ. वैभव नाईक यांनी कुसगांव अन्नबाववाडी येथे तुकाराम आईर घराजवळ लिंगेश्वर मंदिर रस्त्यावर साकव तसेच गिरगाव कुसगाव मुख्य रस्ता ते गिरगाव रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, गिरगाव घाडीवाडी येथे विंधन विहीर ,पंप व टाकी बसविणे हि कामे मंजूर केली आहेत. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुसगाव येथे बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला या कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, दीपक आंगणे, विभाग प्रमुख नरेंद्र राणे, कन्याश्री मेस्त्री,संदीप सावंत,प्रदीप गावडे, मंगेश मर्गज,दिवाकर आईर, कुसगाव सरपंच सौ. सावंत,उपसरपंच संतोष सावंत, शशिकांत आचरेकर, प्रगती चवाटेकर आदींसह गिरगाव, कुसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.