Home स्टोरी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून डिकवल, गोळवणमध्ये बजेट मधील विकास कामांचा धडाका…!

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून डिकवल, गोळवणमध्ये बजेट मधील विकास कामांचा धडाका…!

296

भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट २०२१-२२ अंतर्गत डिकवल वरचीवाडी ग्रा.मा. ३२४ या रस्त्याच्या कामासाठी १९ लाख रु व गोळवण चिरमुलेवाडी ग्रा. मा. ३१२ या रस्त्याच्या कामासाठी ९.५० लाख रु निधी मंजूर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. वैभव नाईक यांनी बजेट अंतर्गत हे रस्ते मंजूर करून घेतले होते. परंतु आ. वैभव नाईक हे खोके सरकार मध्ये गेले नाहीत त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने बजेट मधील आ. वैभव नाईक यांच्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. मात्र आ. वैभव नाईक यांनी कोर्टात जात सरकारला हि स्थगिती उठविण्यास भाग पाडले.त्यामुळे हि कामे आता होत असून या दोन्ही कामांची भूमिपूजने काल सोमवारी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, बाळा महाभोज, महिला उपतालुकाप्रमुख प्रज्ञा चव्हाण, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, पोईप विभाग प्रमुख विजय पालव,उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, समन्वयक कृष्णा पाटकर, शिवरामपंत पालव,युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, सोमनाथ माळकर, रुपेश वर्दम, नाना नेरकर, बाबू टेंबुलकर,दर्शन म्हाडगूत, वंदेश ढोलम, बबन परब, सुशील पालव, आनंद चिरमुले, ओम लाड,मंगल चिरमुले, रुचिका चव्हाण, सुगंधा गावडे, सिंलू गावडे, संजय गावडे, अनंत गावडे, जनार्दन गावडे, अनिल गावडे, नवनीत चव्हाण, बबन चिरमुले, नामदेव गावडे,आप्पा चिरमुले, प्रवीण चिरमुले, अजिक्य परब,गोविंद चिरमुले,राजेश गावडे, अनंत राणे, सत्यविजय चिरमुले, नंदादीप नाईक, संतोष हिवाळेकर,समीर लाड, राजू गावडे, रघुनाथ सावंत, विशाल धुरी आदींसह पोईप विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.