Home स्टोरी आहारात रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्व! आत्मा उपसंचालक एन एस परीट 

आहारात रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्व! आत्मा उपसंचालक एन एस परीट 

189

पोईप येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा!

 

मालवण (मसुरे) प्रतिनिधी:

 

सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. या भूमीत अनेक प्रकारच्या रानभाज्या, औषधी वनस्पती नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. आहारात रानभाज्यांची साथ मिळाल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन आत्मा उपसंचालक एन एस परीट यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण,कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) अंतर्गत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन पोईप ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच मनाली नाईक, आत्मा उपसंचालक एन.एस. परीट, मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी, प्र.मंडळ कृषि अधिकारी पोईप श्री डी.के.सावंत, ग्रामसेविका श्रीमती सडवेलकर, प्र.मंडळ कृषि अधिकारी आचरा श्री डी.डी.गावडे, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, आत्मा स.तं.व्य श्री एन.एम.गोसावी, रानभाजी अभ्यासक श्री रामचंद्र शृंगारे आदी उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी म्हणाले, पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या जास्तीत जास्त आहारात वापरा. आजारांना दूर ठेवण्यास रानभाज्या निश्चित मदत करतील. तसेच श्री.रामचंद्र शृगांरे यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एस.एस.चव्हाण यांनी तर प्रास्ताविक श्रीम.स्नेहल जिकमडे यांनी केले.यावेळी बहुसंख्य महिला शेतकरी व बचत गटांनी सहभाग घेतला होता.एकूण ८२ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला, यावेळी प्रथम क्रमांक श्रीम.श्रीलेखा शामसुंदर मालोंडकर (निवडुंग खोडाची भाजी), द्वितीय क्रमांक श्रीम.नंदिनी नंदकिशोर तावडे(बांबूचे सूप ), तृतीय क्रमांक श्रीम.अनिता अनंत राणे( टाकळावडी) तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रदर्शनास पंचक्रोशीतील हायस्कूल व प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वंच अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. यावेळी मसदे सरपंच सौ श्रिया परब, अरुण मेस्त्री, तुकाराम पालव, शोभा पांचाळ तसेच ग्राम सदस्य, पोईप ग्रामस्थ,महिला उपस्थित होत्या.