Home स्टोरी आसोली ग्रामपंचायतमध्ये क्रांती दिन साजरा.

आसोली ग्रामपंचायतमध्ये क्रांती दिन साजरा.

533

आसोली: आज ९ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन आहे. भारताच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपलं शेवटचं स्वातंत्र्य युद्ध ‘भारत छोडो’, ‘चले जाव‘ आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिविरांनी बलिदान दिले. याचीच आठवण म्हणून आपण ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा करतो. जिल्ह्यात आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन वेगवेगळ्या ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

तसेच आज क्रांती दिना निमीत्त आसोली ग्रामपंचायत मध्ये ‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले. यावेळी उपस्थित व्यक्तींना आपल्या हातावर ज्योत ठेऊन आपल्या देशातील क्रांती विरांना अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. क्रांती विरांच्या आठवणीना उजाळा देत त्यांना अभिवादन करत हा कार्यक्रम खूप उत्साहत संपन्न झाला.