Home Uncategorized आसोली गावातील कुकेरखेंड येथील रस्त्याची दुरावस्था!

आसोली गावातील कुकेरखेंड येथील रस्त्याची दुरावस्था!

333

वेगुर्ला: आसोली गावातील कुकेरखेंड येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे.  हा रस्ता वाहतुकीसाठी खूप धोकादायक बनला होता.  गणेश चतुर्थी सण अगदी जवळ आला आहे आणि त्यामुळे या रस्त्यावर आता वर्दळ वाढली आहे. तसेच याच रस्त्यावरून गावकरी गणेश मूर्ती ही आणतात. असा सर्वात महत्त्वाचा वाढदिवस जोडला जाणारा रस्ता असून या रस्त्याची खूपच दुरावस्था आहे. रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करतांना मोठा अपघात होऊ शकतो हे नाकारता येणार नाही.

गावातील कुकेरखेंड येथील रहिवाशांसाठी हा प्रमुख रस्ता आहे. अगदी आठ दिवसांवर गणेश चतुर्थी आहे आणि याच रस्त्यावरून ग्रामस्थ गणेश मूर्ती घेऊन जातात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनर्थ किंवा त्रास होऊ नये यासाठी आसोली गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी, कुकरखेंड वाडीतील ग्रामस्थांनी आणि जोसोली वाडीतील ग्रामस्थांच्या स्वखर्चातून व श्रम दनातून हे काम पूर्ण केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री स्वप्निल गावडे, राकेश धुरी आणि नेत्रा राणे उपस्थित होत्या. त्याच बरोबर ग्रामस्थ बाळू गावडे, नारायण गावडे, ताता परब, अमेय परब, नारायण राणे, गज्या राणे, सद्गुरू परब, बाळा राणे, न्हानु गावडे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

हा रस्ता प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर आहे. पण काही तांत्रिक कारणामुळे बरेच महिने काम प्रलंबित आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे खूप हाल होतात. त्यामुळे लवकर ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण करून रस्त्याचे काम सुरु करावं अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.