Home स्टोरी आसोलीतील धुरी मूळ पुरुषमंदिरात १४ रोजी कार्यक्रम….

आसोलीतील धुरी मूळ पुरुषमंदिरात १४ रोजी कार्यक्रम….

241

आसोली: (वेंगुर्ला), ता. ११: वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावात धुरी बांधवांचा श्री कुळ व परिवार देवता सग्रह सवास्तू संप्रोक्षण विधी सोहळा श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात रविवार दि. १४ मे रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री देव नारायण पंचायतन देवतांचे श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात आगमन व स्वागत, सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री ९.३० वाजता कसई – दोडामार्ग येथील श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे, असे आसोली आणि मुंबई येथील श्रीदेव धुरी मूळ पुरुष मंदिर जीर्णोद्धार कमिटीने कळविले आहे.