Home क्राईम आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक!

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक!

133

आसाम: आसामच्या बारपेटा जिल्ह्यात ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या प्रतिबंधित आतंकवादी संघटनेशी संबंधित ३ जिहाद्यांना आसाम पोलिसांनी नुकतीच अटक केली. अटक करण्यात आलेले झाकीर हुसेन आणि अबू सामा हे ‘पी.एफ्.आय.’चे राज्य सचिव आहेत, तर तिसरा आरोपी शाहिदुल इस्लाम हा ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित ‘सी.एफ्.आय.’(कँपस फ्रंट ऑफ इंडिया) या विद्यार्थी संघटनेचा कोषाध्यक्ष आहे. आरोपींकडून रोख रक्कम आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पी.एफ्.आय’चे सदस्य ‘एस्.डी.पी.आय.’मध्ये सहभागी !
‘पी.एफ्.आय’वर बंदी घातल्यानंतर त्याचे सर्व सदस्य ‘एस्.डी.पी.आय.’मध्ये सहभागी झाले आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. ‘पी.एफ्.आय.’चे सदस्य आता ‘एस्.डी.पी.आय.’च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात उतरण्याची सिद्धता करत आहेत.