Home स्टोरी आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामे करण्यासाठी सक्ती करू नये

आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामे करण्यासाठी सक्ती करू नये

145

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आशा व गटप्रवर्तकांना आयुष्यमान भारत, आभा कार्ड व लाभार्थ्याना मोफत आरोग्य सल्ला ही ऑनलाईन कामे करण्यासाठी सक्ती करू नये अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन वतीने नुकतीच करण्यात आली. अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी याच्याकडे केली.त्याचाच एक भाग म्हणून चौके आरोग्य केंद्रातील आशा वर्कर्सनी चौके आरोग्य अधिकारी याच्याकडे मागणी केली आहे.यावेळी अक्षता गोसावी,अनिता चौकेकर,आकाशा गोसावी,रक्षीता तारी,रिया आचरेकर,साधना राणे,गौरी सुकाळी,चारूशिला कांबळी,सिध्हाली गावडे,वैशाली बिरमोळे,प्रणाली चव्हाण,वंनदिता चव्हाण,मनजीरी मेस्त्री,साक्षी परब,प्रनिता भोगावकर,समिक्षा शिंदे,शितल वालावलकर,अप्रिता सुर्वे उपस्थित होत्या.

 

आशा व गटप्रवर्तक यांना शासनाकडून मोबाईल मिळालेला नाही. किमान अत्याधुनिक सोयी सुविधा न पुरवता त्यावर आधारित काम करायला सांगणे बेकायदेशीर आहे. आणि सर्वच आशाच्याकडे दर्जेदार,आधुनिक अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत. तसेच आशा या सामाजिक आरोग्य कार्यकर्ते असून फक्त दहावी ते बारावी ईतकेच शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्याच्याकडून ऑनलाईन माहिती भरली जाण्याची शक्यता कमी आहे. यासाठी दिला जाणारा हा मोबदला अतिशय कमी आहे. त्यामुळे जो पर्यत शासनाकडून दर्जेदार मोबाईल, इंटरनेट डाटासाठी दरमहा ४००रू. व कार्ड तयार करून वाटण्यासाठी प्रती कार्ड १०० दिल्याशिवाय सदरची ऑनलाईन कामे आशाना सांगू नयेत अशी मागणी या निवेदनात केली आहे. तरी शासनाने आमच्या या न्याय्य मागण्याचा विचार करावा. चौके आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या आशानी हे निवेदन चौके वैद्यकीय अधिकारी प्रणव पोळ यांच्याकडे दिले.