मसुरे प्रतिनिधी: स्पर्धेच्या युगात अनेक आव्हाने तुमच्या समोर आहेत. आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करा. स्पर्धा कधीच संपत नसते. यशात सातत्य ठेवल्यास जीवनात यशस्वी व्हाल.सन्मानाने जगण्यासाठी इतरांपेक्षा काही तरी वेगळे करण्याचा निश्चय करा. शालेय जीवनातच करियरचा मार्ग निश्चित करा असे प्रतिपादन श्री भगवती एज्यू. सोसायटी व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी येथे केले. देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवस्थानच्या वतीने गावातील पहिली ते दहावी प्रथम तीन क्रमांक तसेच स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री भगवती देवालय येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, पोलीस पाटील सौ. साक्षी गोविंद सावंत,देवस्थान सचिव निषाद परुळेकर, उपसरपंच दशरथ मुणगेकर, शिक्षक प्रसाद बागवे, विश्वस्त प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, मनोहर मुणगेकर, अनिल धुवाळी, कृष्णा (दादा ) सावंत, रामचंद्र मुणगेकर, देवदत्त पुजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विध्यार्थ्यांच्या यशामागे कठीण असे कष्ट असतात. इतर यशस्वी विध्यार्थ्यांचा आदर्श घ्या. मोबाइल मधील रिल्सच्या मागे न लागता वाचन वाढवा असा मौलिक सल्ला भगवती हाय.चे शिक्षक प्रसाद बागवे यांनी विध्यार्थ्यांना दिला. यावेळी मयुरेश पुजारे, दक्षेश मांजरेकर, देवांग मेस्त्री, वेदांत तवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षण तज्ञ सौ. शरयू घाडी यांनी देवस्थानला लोखंडी कपाट, पैसे मोजणे मशीन भेट दिल्या बद्दल आभार मानण्यात आले. देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती अध्यक्ष ओंकार पाध्ये यांनी दिली.
यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजू पुजारे, लिपिक रामतीर्थ कारेकर, वायरमन श्री गावकर, दिगंबर पेडणेकर, डॉ सुजित कदम, प्रवीण सावरे, संदेश धुवाळी, पांडुरंग नाडगौडा, नंदकुमार सोनटक्के, धाकोजी सावंत, सत्यवान घाडी, सुरबा सावंत, अरविंद सावंत, सौ. रश्मी कुमठेकर, अनुष्का मुणगेकर, अनुजा कारेकर, प्रकाश आईर, गणपत दळवी, अशोक बागवे, नाना बागवे, मंगेश लब्दे, मनोज सावंत, मोहन परब, बळीराम मुणगेकर, विश्वास मुणगेकर, सुनील सावंत, सिताराम मुणगेकर, अजित रसम, रवींद्र आईर आदी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत सचिव निषाद परुळेकर तर सूत्रसंचलन आबा पुजारे यांनी केले.