Home शिक्षण आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे दत्तक पालक योजनेमार्फत २० विद्यार्थी दत्तक.

आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे दत्तक पालक योजनेमार्फत २० विद्यार्थी दत्तक.

115

मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल या प्रशालेच्या २० विद्यार्थ्यांना आर. पी. बागवे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दत्तक पालक योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. शालेय गणवेश,दप्तर, छत्री, पॅड व लेखन साहित्य मिळून २००० रू. किमतीचा वस्तू प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

यामध्ये अमरोझ फर्नांडिस यांनी ५ विद्यार्थी, राजन गोरे यांनी २ विद्यार्थी, सुदाम परब यांनी २ विद्यार्थी, पुष्पा बागवे (प्रिती राणे) यांनी २ विद्यार्थी, रमेश पाताडे, अर्चना कोदे व आप्पा परब प्रत्येकी एक विद्यार्थी, याशिवाय राजन परब १, प्रसाद बागवे १ असे विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण वर्षभराचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय ३ गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभरातील मोफत एस टी पास देण्यात येणार आहे.

यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे, रमेश पाताडे , एन एस जाधव सर, घाटे सर, समीर नाईक सर, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती भोगले मॅडम व श्रीमती तळाशीलकर मॅडम तसेच जगदीश चव्हाण संस्था सभासद उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी सर्व दात्यांना धन्यवाद दिले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री रमेश पाताडे यांनी केले..