न्हावेली वार्ताहर: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संस्थेच्या विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,आरोस येथे प्रा.हर्षद राव यांचा विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रा. राव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी व युवक हे आपल्या देशाचे आधारस्तंभ व भविष्य आहेत.विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ,आपली ध्येये गाठण्यासाठी कशाप्रकारे दृष्टिकोन ठेवावा,कोणकोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात सुद्धा योग्य असे मार्गदर्शन त्यांनी केले.या मार्गदर्शन वर्गाला इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रा.मुख्याध्यापिका अनुष्का गावडे, प्रा.नितीन बागवे, प्रा.सुषमा मांजरेकर, प्रा.रूपा कामत, शालेय मुख्यमंत्री सृष्टी नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मोहन पालेकर यांनी केले.