सावंतवाडी प्रतिनिधी: कोलगाव येथील निरामय विकास केंद्राच्यावतीने आरोस – दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत श्रवण यंत्र वितरीत करण्यात आले. निरामय विकास केंद्राच्यावतीने या कर्णबधिर विद्यालयातील एकुण ११ विद्यार्थ्यांना सुमारे ४५ हजार रुपयांची श्रवण यंत्रे देण्यात आली.
यावेळी निरामय विकास केंद्राच्या अध्यक्षा वंदना करंबेळकर, विश्वस्त प्रसाद घाणेकर, भरत गावडे, अर्चना वझे, माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश उकरंडे, व्यवस्थापिका द्वारका कुलकर्णी, शिक्षक संदीप पाटील, भाऊराव चाटसे, सुनिल देशमुख, राजू काळे, महेंद्र मिराशी, प्रसाद उद्धार, शरद चव्हाण, बाबासाहेब पाटील, अस्मिता कुडाळकर, सुवर्णा काळे आदी उपस्थित होते.
यावेळी निरामय विकास केंद्राच्या अध्यक्षा वंदना करंबेळकर यांनी माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील उर्वरित मुलांना टप्प्याटप्प्याने लवकरच श्रवण देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी भरत गावडे यांनीही कर्णबधिर मुलांना घडविणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक करीत सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी कर्णबधिर निवासी विद्यालयाच्या व्यवस्थापिका द्वारका कुलकर्णी आणि मुख्याध्यापक सतीश उकरंडे यांनी कर्णबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांना मोफत श्रवण यंत्र दिल्याबद्दल कोलगाव निरामय विकास केंद्राचे आभार मानले.